मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. वांद्रे येथील ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याशेजारील बंगला हा काही दिवसांपूर्वी सील करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वतः कारचं स्टेअरिंग हातात घेतलं आहे. (Uddhav Thackeray)
पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. पुण्यातील चिंताजनक परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते स्वत: पुण्याला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री गुरुवारी (30 जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास पुण्याला रवाना झाले असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवली आहे.
पुणे विभागीय आयुक्तालयात आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहेत. पुणे जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांचा आढावा आणि त्यासाठी उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतं. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व पुण्याचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवली होती आणि ते कॅबिनेटच्या बैठकीत पोहचले होते. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन त्यांनी आपल्या कार चालकाला सुट्टी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच कॅबिनेटच्या बैठकीत जाण्यासाठी त्यांनी स्वतः कार चालवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्टेअरिंग हातात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध
मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन
WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!
CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई
CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात