मुंबई : राज्य सरकारने आज चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार राज्यात केवळ दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. तर केवळ रेड आणि नॉन रेड झोनच ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही झोनमध्ये कन्टेन्मेंट झोन असणार आहे.
मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती रेड झोनमध्ये आहेत. तर राज्यातील उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये येणार आहे. कंटेन्मेंट झोनची जबाबदारी स्थानक प्रशासनावर देण्यात आली आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासनाला यावर निर्णय घ्यायचा आहे. रेड झोनमध्ये रिक्षा, टॅक्सीला परवानगी नाही. चारचाकींना १+२ परवानगी आहे. तर दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी आहे. हॉटेलना होम डिलिव्हरीची परवानगी नाही. मालवाहतूक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
नॉन रेड झोनसाठी मोठी सूटतर नॉन रेड झोनमध्ये नागरिकांना २२ मेपासून प्रशासनाची कोणतीही परवानगी घ्यावी लागणार नाही. वैयक्तीक वापरासाठी स्पोर्टस कॉम्प्लेक्स, सार्वजनिक ठिकाणे खुली होणार आहेत. मात्र, सांघिक वापर करता येणार नाही. हे सर्व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरु ठेवता येणार आहे. नॉन रेड झोनमध्ये दुचाकी चालकच प्रवास करू शकणार आहे. तर चीनचाकींना १+२ अशी परवानगी देण्यात आली आहे. चारचाकींनाही १+२ परवानगी आहे. जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु होणार असून यामध्ये क्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यासंबंधीचे आदेश वेगळे काढण्यात येणार आहेत. तसेच सकाळी ९ चे सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व बाजारपेठा, दुकाने सुरु ठेवता येणार आहेत. मात्र, जर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले तर मात्र प्रशासनाला सर्व अधिकार दिलेले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus चीनने आधी 'मारले', आता औषध देण्याची तयारी; जगाच्या भल्यासाठी घेतले दोन मोठे निर्णय
राज्यातून ग्रीन, ऑरेंज झोन हद्दपार; 22 मेपासून लॉकडाऊनमध्ये मोठे बदल
भाजपा आमदाराने बीडच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला; गुन्हा दाखल
बापरे! १०८ मेगापिक्सलचा Motorola Edge+ लाँच; लगेचच 15000 चा डिस्काऊंट
मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु
हवाई दलाचा हवेतल्या हवेत असा पराक्रम...जो पाहून उर भरून येईल
CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर