मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत गेलेल्या परंतु लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या सुमारे १६०० मराठी विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात आणण्याची तयारी झाली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्याला यश येऊन रेल्वे मंत्रालयाने या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यासाठी दिल्ली-भुसावळ या विशेष रेल्वेला मान्यता दिली आहे. १६ मे रोजी ही रेल्वे दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकावरून निघून दुसऱ्या दिवशी भुसावळला पोहोचेल. महाराष्ट्राच्या हद्दीत आल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छित स्थानकावर उतरण्यास परवानगी मिळेल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कल्याण व पुणे स्थानकावर रेल्वेला थांबवण्याचाही विचार होऊ शकेल.
coronavirus: दिल्लीतील मराठी विद्यार्थी रविवारी राज्यात परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:07 AM