पुणे : राज्यात काेराेनाचा प्रसार वाढत असल्याने आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी (मनविसे) मास्क व सॅनिटायझर रेशनच्या दुकानावर उपलब्ध करुन देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.
काेराेनाचा प्रभाव वाढल्याने नागरिक खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. काेराेनाचा मुकाबला करण्यासाठी हात सतत स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याने हॅन्ड सॅनिटायझरची मागणी माेठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे त्यांचा तुटवडा भासत असल्याने अनेकांकडून ते चढ्या दराने विकले जात आहेत. त्यामुळे आता मनविसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांना पत्र लिहून मास्क आणि सॅनिटायझर रेशनच्या दुकानावर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
काेराेनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना नागरिकांची मास्क व सॅनिटायझर खरेदीसाठी वाढलेल्या मागणीमुळे माेठा तुटवडा निर्माण झाला आहे. काही विक्रेते अधिक दराने मास्क व सॅनिटायझरची विक्री करत असल्यामुळे सर्वसामान्य व गरीब नागरिकांना ते विकत घेणे परवडत नाही. विद्यार्थी, बेराेजगार, कामगार, पथारी, व्यावसायिक, स्वच्छता कामगार, दारिद्र रेषेखालील तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा खर्च परवडणारा नाही. त्याचप्रमाणे बाेगस कंपन्यांकडून बनावट मास्क व सॅनिटायझरची विक्री माेठ्याप्रमाणावर हाेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी रेशनिंग दुकाने, प्राथमिक आराेग्य केंद्र, सरकारी दवाखाने, राज्य आराेग्य केंद्र, वाॅर्ड ऑफिस, इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सवलतीच्या दरात मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे. असे मनविसेच्या पत्रात लिहीले आहे.