- अतुल कुलकर्णीमुंबई : कोरोनाच्या दहशतीचा फायदा घेत मास्क बनविणाऱ्या दोन कंपन्यांनी सरकार आणि जनतेला कोट्यवधी रुपयांना लुटले हे ‘लोकमत’ने उघडकीस आणलेले सत्य राज्य सरकारने नेमलेल्या समितीने मान्य केले. काही महिन्यांत व्हीनस व मॅग्नम या दोन कंपन्यांनी तब्बल २०० कोटींहून अधिक रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याची धक्कादायक माहिती समितीच्या अहवालातून समोर आली आहे.‘लोकमत’ने हे उघड केल्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चार सदस्यीय समिती नेमली. समितीचा अहवाल मंगळवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना सादर करण्यात आला. त्याची प्रत ‘लोकमत’कडे आहे.झडप असलेले एन ९५ मास्क वापरू नयेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारसही समितीने केली आहे.समितीच्या शिफारसीनिर्धारित किमतीमध्ये उत्पादन खर्च आणि इतर सर्व घटक समाविष्ट.मास्क उत्पादक कंपन्या, घाऊक व किरकोळ विक्रे ते यांनी मास्कची विक्री किंमत दर्शनी भागात लावावीसाथरोग कायदा १८९९ च्या तरतुदी लागू असेपर्यंत हे दरही लागूकिमतीच्या तक्रार निवारणासाठी राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व प्रशासन तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नेमावे.मास्क उत्पादक कंपन्या उत्पादन बंद करण्याची परिस्थिती निर्माण करीत असतील तर योग्य त्या उपाययोजना शासनाने कराव्यात.थेट आरोग्य सेवा देणाºया संस्थांना कंपन्यांनी त्यांचे उत्पादन विक्री चालू ठेवण्याबाबत सूचना द्याव्यात.थेट विक्री करताना त्याचा भाव कमाल विक्री किमतीच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.आरोग्य सेवा-सुविधा देण्याऱ्या संस्थांनी त्यांनी खरेदी केलेल्या किमतीच्या ११० टक्क्यांहून अधिक किंमत आकारू नये.४५ टक्के नफा गृहीत धरून समितीने सुचविलेल्या किमतीमास्कचे नाव सध्या सुचवलेलीएन-९५, व्ही शेप १३५ १९एन-९५, थ्री डी १३५ २५एन-९५, विदाउट व्हॉल्व्ह ९५ २८एन-९५, एम-एच कप १३५ ४९सीएन-९५+एन-९५ कप १०५ २९(विदाउट व्हॉल्व्ह)७१३ डब्ल्यू-एन-९५-६डब्ल्यूई १३० ३७(कप, विदाउट व्हॉल्व्ह)७२३ डब्ल्यू-एन-९५-६आरई १३० २९(कप शेप विदाउट व्हॉल्व्ह)आयएसआय प्रमाणित १४० १२एफएफपी-२ मास्क२ प्ला सर्जिकल विथ १० ०३लूप ऑर टायथ्री प्लाय सर्जिकल १६ ०४विथ मेल्टडॉक्टर किट ५ एन-९५ ४७५ १२७+५ थ्री लेअर ब्लोन मास्क
CoronaVirus News: सरकार आणि जनतेला मास्क कंपन्यांनी लुटले; २ महिन्यांत २०० कोटींचा निव्वळ नफा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 6:02 AM