मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे,शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोरे जात आहे, खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करीत आहेत, पण काही डॉक्टर्स व खाजगी रुग्णालय त्यांच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत,खरंतर आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे. अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत, पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत,या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे. आपणाकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचाच्या संदर्भात लक्षणे आढळल्यास आपण आपल्या परिसरातील शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी.खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकरांच्या कुटुंबातील २० सदस्यांनी केले रक्तदान
राज्यात सध्या जाणवणाऱ्या रक्ताच्या टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या कुटुंबातील २० सदस्यांनी रक्तदान केले. आवश्यक असणारे रक्त सध्या . त्यानंतर आरोग्य राज्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेलाही रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. कोरोना विषाणूच्या संकटावर मात करीत असताना अन्य रुग्णांना उपचारात रक्ताची मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याची आवश्यकता भासते. अशावेळी त्यांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी आणि राज्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून रक्तदान करणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री राजेंद्र-पाटील यड्रावकर यांनी सांगितल. आज त्यांच्या पत्नी, मुलगे, भाऊ, बहिणी, भाची, पुतणे अशा २० जणांनी रक्तदान केले.