मुंबई: वैद्यकीय व्यवस्थापमुळे देशातील मृत्यू दरात घट होत आहे. देशात शनिवारी २.३५ टक्के हा मृत्यूदर नोंदवला आहे. देशातला मृत्यू दर हा जगातल्या सर्वात कमी मृत्यू दरापैकी एक आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राज्यात शनिवारी ३.६५ टक्के मृत्यूदर आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर अधिक असल्याचे दिसून आले आहे. सध्या १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात दिवसभरात ९ हजार २५१ कोरोना बाधितांची नोंद झाली, तर २५७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ इतकी झाली आहे. तर बळींचा आकडा १३ हजार ३८९ झाला आहे. राज्यात शनिवारी ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ७ हजार १९४ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के झाले आहे.
राज्यात शनिवारी २५७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबई ५२, ठाणे ३, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा १२, उल्हासनगर मनपा ५, भिवंडी निजामपूर मनपा ९, मीरा भाईंदर मनपा २, पालघर २, वसई विरार मनपा ७, रायगड ३, पनवेल मनपा ३, नाशिक ४, नाशिक मनपा ८, धुळे १, धुळे मनपा १, जळगाव ५, जळगाव मनपा ४, नंदूरबार १, पुणे १७, पुणे मनपा ४५, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर ८, सोलापूर मनपा ४, सातारा १, कोल्हापूर ७, सांगली २, सांगली मिरज कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी ५, औरंगाबाद मनपा ४, जालना ३, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा १, अकोला १, अमरावती १, बुलढाणा १, नागपूर मनपा १, वर्धा १, अन्य राज्य/देश १ या रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत शनिवारी १ हजार ८० रुग्ण व ५२ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. यामुळे आतापर्यंत १ लाख ८ हजार ६० कोरोना रुग्ण झाले असून ६ हजार ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ हजार ८७६ इतकी असून सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ८५४ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० प्रयोगाशाळा नमुन्यांपैकी १९.९४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ८ लाक ९४ हजार व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ४४ हजार ६०३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.