शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:11 AM

धक्कादायक आणि चिंतावाढवणारी गोष्ट म्हणजे या डॉक्टरने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

मुंबई- कोरोना संक्रमणासंदर्भात एक धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. येथे एका डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धक्कादायक आणि चिंतावाढवणारी गोष्ट म्हणजे या डॉक्टरने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मुलुंड भागात राहणाऱ्या या डॉक्टरचे नाव सृष्टी हलारी असे आहे. गेल्यावर्षी जून 2020 पासून आतापर्यंत तब्बल तीनवेळा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याच वर्षी लस घेतली आहे. याहुनही धक्कादायक बाब म्हणजे, या डॉक्टरचे संपूर्ण कुटुंब, लस घेतली असतानाही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. (CoronaVirus Mumbai doctor got corona infected for third time has taken both doses of corona vaccine)

Corona Vaccination: मोठ्ठा दिलासा! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी पॉझिटिव्ह बातमी; भारतीयांचं टेन्शन दूर

डॉ. सृष्टी हलारी यांना तीनवेळा कोरोनाची लागण झाल्याने आता त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी एकत्रित करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या मते, त्यांना तिसऱ्यांदा संक्रमण होण्यामागे, कोरोना व्हेरिएंटपासून, इम्यूनिटी लेव्हलपासून ते अगदी चुकीच्या रिपोर्टपर्यंत अनेक कारणे असू शकतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, कोरोना लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, असे रुग्ण लवकरच बरेही होतात.

डॉ. सृष्टी हलारी यांनी दिली महत्वाची माहिती -डॉ. सृष्टी हलारी यांनी सांगितले, "मी पहिल्यांदा कोरोना संक्रमित झाले, कारण एक सहकारी कर्मचारी संक्रमित आढळला होता. यानंतर मी माझी पोस्टिंग पूर्ण केली आणि पीजी अ‍ॅडमिशन परीक्षेआधी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.  आणि घरीच थांबले. जुलै महिन्यात माझे संपूर्ण कुटुंब कोरोना संक्रमित झाले होते." 

CoronaVirus News : पैशांसाठी काय पण! आधी कोरोना मृताचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार अन् आता मदतीसाठी पसरले हात

तसेच, सृष्टीवर उपचार करत असलेल्या डॉ. मेहूल ठक्कर यांनी सांगितले, की "मे महिन्यात झालेले दुसरे संक्रमण जुलै महिन्यात पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट झाले असावे अथवा आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल, असेही होऊ शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईdoctorडॉक्टर