रत्नागिरी : मंगळवारचा एक दिवस शांत झालेल्या रत्नागिरीला बुधवारी मोठा धक्का बसला. बुधवारी रात्री मिळालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे २२ नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कारोनाबाधितांची संख्या ७४ झाली आहे. या नव्या २२ रूग्णांमधील बहुतेक रूग्ण हे मुंबईहून रत्नागिरीत आलेले असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
रत्नागिरीत एकाच दिवशी मोठ्या संख्येने बाधीत रूग्ण आढळण्याचा विक्रमच बुधवारी गाठला गेला आहे. मंगळवारी दिवसभरात एकही पॉझिटिव्ह रूग्ण न आढळल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वेग मंदावण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र मुंबईहून कोकणात येणाºयांना मोठ्या प्रमाणात पासेस दिले जात असल्याने बुधवारी रूग्णांच्या संख्येत मोठी भर पडली.
रत्नागिरीतून पाठवलेल्या १४६३ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असताना २४ जणांचा अहवाल जिल्हा रूग्णालयाला मिळाला. त्यातील दोन अहवाल निगेटिव्ह असून, उर्वरित २२ पॉझिटिव्ह आहेत. त्यात रत्नागिरी तालुक्यातील ७, मंडणगडमधील ११ तर दापोतील ४ रूग्णांचा समावेश आहे. मंडणगडच्या ११ रूग्णांपैकी ७ पुरूष आहेत तर ४ महिला आहेत. दापोलीतील चारही रूग्ण पुरूष आहेत. रत्नागिरीतील ७ रूग्णांमध्ये ४ महिला तर तीन पुरूष आहेत. हे रूग्ण कोणकोणत्या तालुक्यातील आहेत, याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती.
लोकप्रतिनिधींची भूमिका अंगाशीमुंबईतील चाकरमान्यांना कोकणात परत आणणारच, अशी भूमिका सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी घेतली होती. त्यामुळे विनापास प्रवास करून आलेल्या मुंबईतील लोकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता मुंबईकर मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रूग्ण संख्या ७४ वर पोहोचली आहे.
गावात गेले होते का?बुधवारी पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेले २२ रूग्ण मुंबईतून आल्यावर विलगीकरण कक्षातच होते का? की ते आपल्या गावात गेले होते? याची माहितीही रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडल्याने यंत्रणा हडबडली आहे. सर्वच यंत्रणा आता पुन्हा कामाला लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या....
CoronaVirus धोक्याची घंटा! मुंबईत राज्याच्या निम्म्याहून अधिक नवे रुग्ण; 40 बळी
CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये विक्रमी वाढ; एकूण आकडा २५ हजार पार
खूशखबर! विशेष रेल्वे सेवा सुरु होणार; २२ मेपासून वेटिंग लिस्ट
मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
बाबो! तब्बल दोन महिन्यांनी दुकाने, सिनेमा गृहे उघडली; अवस्था पाहून शॉक बसेल
रेडमीचे फोन पुन्हा महागले; दीड महिन्यांतील मोठी वाढ
सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ