मुंबई: राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपेंची भेट घेऊन शरद पवार यांनी तात्काळ १ हजार १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं. राष्ट्रवादीकडून ट्विटरवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.देशातील कोरोनाची लाट ओसरतेय?; बघा, आकडेवारी काय सांगतेयआज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्यानं १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केल्याचं पवार यांनी टोपेंना सांगितलं. सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचना यावेळी शरद पवार यांनी राजेश टोपे यांना केली.
CoronaVirus News: ...अन् शरद पवार पुन्हा मदतीला धावले; कोरोना संकट काळात मोलाची मदत
By कुणाल गवाणकर | Published: September 23, 2020 3:54 PM