शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoornavIrus News: ...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 7:09 PM

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीला जयंत पाटील यांच्याकडून आकडेवारीनं प्रत्युत्तर

मुंबई: कोरोना संकटात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकरार परिषदेच्या माध्यमातून फडणवीस आणि मोदी सरकारचा समाचार घेतला.जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा संकट काळात सरकारच्या बाजूनं उभी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून यंत्रणेचं आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली. मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या तिकिटाचा खर्च मुख्यमंत्री निधीतून केला जात आहे. मुख्यमंत्री निधीला फडणवीस यांच्या भाजपानं एका पैशाची मदत केलेली नाही. त्याऐवजी ते पीएम केअर्सला मदत करण्याचं आवाहन करत होते. त्यामुळे भाजपा महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र असा प्रश्न निर्माण होतो. फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी केलेली ही कृती महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात राहील, असं पाटील म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीचा जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेतून देण्यात आलेल्या मदतीचा संदर्भ दिला. या योजनेतून ७३ लाख १६ हजार सिलिंडर दिले. त्यावर १ हजार ६२५ कोटी रुपये केंद्रानं खर्च केले, असं फडणवीस यांनी सांगितलं. या रकमेला सिलिंडरच्या संख्येनं भागलं, तर एका सिलिंडरची किंमत २ हजार २२६ रुपये होते. एका सिलिंडरची किंमत इतकी आहे का? मग केंद्राकडून दिलं जाणारं अनुदान कुठे गेलं?, असे सवाल पाटील यांनी विचारले. उत्तर भारतीय मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर वेळ लागेल, असं देवेंद्र फडणवीस काल बोलून गेले. फडणवीस यांचं विधान म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. राज्यातल्या तरुणांमध्ये आवश्यक कौशल्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्किल इंडिया योजना आणली होती. त्याचा पाच वर्षात काहीच उपयोग झाला नाही? स्थानिक तरुणांमध्ये स्किल नाही, असं फडणवीस यांना म्हणायचं आहे का? मोदींच्या स्किल इंडियावर त्यांना भरवसा नाही का?, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले."फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटाविरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलAnil Parabअनिल परबBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात