मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज १२,२४३ रुग्ण बरे होऊन घरी (Patients discharge) गेले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ४,५९,१२४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३७ % एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३२ % एवढा आहे. सध्या १,६२,४९१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४६, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा २, वसई विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल २, नाशिक ७, अहमदनगर १७, जळगाव २०, पुणे ५९ पिंपरी चिंचवड मनपा ३६, सोलापूर ३, कोल्हापूर २२, सांगली १५, नागपूर २१ यांचा समावेश आहे.
नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यूंपैकी २३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू पुणे १४, कोल्हापुर ८, ठाणे ४, औरंगाबाद २, जळगाव २ , नाशिक १ आणि सांगली १ असे आहेत.
आज १२,२४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,५९,१२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले आहे.
११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईनआजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४,१४,८०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,४३,२८९ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आणखी बातम्या...
पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांकडून भारताला पुन्हा अणुबॉम्बची धमकी, म्हणाले...
पती तेजप्रताप यादव विरोधात निवडणूक लढणार ऐश्वर्या? वडील चंद्रिका राय यांच्याकडून संकेत
१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका
मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!
जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन