मुंबई : राज्यात रविवारी १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण कोविडमुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.६४ टक्के आहे.राज्यात दिवसभरात १३ हजार ७०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ३२६ बळी गेले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ४३ हजार ४०९ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा ३८ हजार ८४ झाला.सध्या २ लाख ५५ हजार २८१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात नवजात बालक ते १० वयोगटांतील ५२,४८६ बालकांना, तर ११ ते २० वयोगटांतील ९७,६०६ मुला-मुलींना कोरोनाची लागण झाली.कोरोना काळात पावणेतीन लाख गुन्हेकोरोना काळात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख ७५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली असून, २९ कोटी ६६ लाखांचा दंड आकारण्यात आला.
CoronaVirus News: राज्यात दिवसभरात १५ हजार रुग्ण कोविडमुक्त; ३२६ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 3:25 AM