मुंबई : राज्यात रविवारी १८ हजार ६०० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. दिवसभरातील २२ हजार ५३२ रुग्णांसह आजपर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.५५ टक्के इतके आहे.राज्यभरात सध्या २ लाख ७१ हजार ८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर रविवारी ४०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली .सध्या राज्यातील मृत्युदर १.६५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ९४ हजार ८४४ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या तीन कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ नमुने पॉझिटिव्ह आले असून, हा दर १६.४४ टक्के इतका आहे. सध्या राज्यात १९ लाख ९८ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १२ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. ठाणे जिल्ह्यात ७०८ रुग्ण ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ७०८ रुग्ण रविवारी आढळून आले असून ५१ जण दगावले आहेत. आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पाच लाख १५ हजार ८२७ झाली असून नऊ हजार २१४ मृतांची नोंद केली आहे.ठाणे शहरातही १४४ रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण एक लाख २८ हजार ८६८ रुग्ण नोंदले आहेत. कल्याण - डोंबिवलीला १५८ रुग्ण आढळून आले असून २२ मृत्यू झालेत. उल्हासनगरला ६३ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. भिवंडीला १० रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरला ८७ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहेत. अंबरनाथ शहरात ३१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरला २५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण २० हजार ५५८ असून एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूसंख्या २५४ आहे. .
CoronaVirus News: राज्यात रविवारी १८,६०० नवे कोरोनाबाधित; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 7:46 AM