मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ३ हजार २१४ रुग्णांचे निदान झाले तर ७५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार १० झाली असून मृतांचा आकडा ६ हजार ५३१ वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०९ टक्के झाले असून मृत्यूदर ४.६९ टक्के आहे. सध्या राज्यात ६२ हजार ८३३ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात मंगळवारी २४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांत झाले आहेत, तर उर्वरित १७३ मृत्यू मागील काळातील आहेत. १७३ या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६५, सोलापूर ४२, औरंगाबाद १५, ठाणे १३, नाशिक १८, जळगाव ७, अमरावती १, बुलडाणा १, कल्याण-डोंबिवली २, मालेगाव १, मीरा-भार्इंदर ३, पिंपरी-चिंचवड १, रत्नागिरी २, सांगली १, सातारा १ यांचा समावेश आहे. तर मागील ४८ तासांत ७५ मृतांमध्ये मुंबई ४२, भिवंडी मनपा १, धुळे मनपा १, पुणे १, पुणे मनपा ८, पिंपरी-चिंचवड मनपा २, सोलापूर मनपा १, सातारा १, सांगली १, रत्नागिरी ४, औरंगाबाद ८, अकोला १, अमरावती मनपा १, यवतमाळ १ आणि बुलडाणा २ या रुग्णांचा समावेश आहे.सध्या मुंबईत ६८ हजार ४१० कोरोना रुग्ण असून ३ हजार ८४४ जणांचे मृत्यू झाले आहेत. ३४ हजार ५७६ जण कोविडमुक्त झाले आहेत, तर २९ हजार ९८२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी दिवसभरात १ हजार ९२५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६९,६३१ जण कोविडमुक्त झाले.
CoronaVirus News : धक्कादायक! राज्यात २४ तासांत ३,२१४ नवे रुग्ण सापडले, मृत्यूदर ४.६९ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:35 AM