शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

CoronaVirus News : शासकीय कर्मचाऱ्यांचे २५० कोटी; मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 2:13 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यातच आपत्ती व्यवस्थापनास मोठा खर्च लागत असल्याने अडचण निर्माण झाली.

मुंबई : कोरोना आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व पुनर्वसनाच्या कामात आपलाही हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्वच आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह राज्य शासनातील गट ड पर्यंतच्या कर्मचाºयांचे मे महिन्यातील एक ते दोन दिवसांचे वेतन कपात केले जाणार आहे. त्याद्वारे तब्बल २५० कोटी रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून दिला जाणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी आदेश काढले आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यातच आपत्ती व्यवस्थापनास मोठा खर्च लागत असल्याने अडचण निर्माण झाली. हाच धागा पकडून काही संघटनांनी राज्य शासनाकडे एक ते दोन दिवसांचे वेतन मदत कार्यासाठी कापण्याचे निवेदन दिले होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष समीर भाटकर यांनी दिली.शासनाचे गट-अ व गट-ड चे (राजपत्रित) अधिकारी व कर्मचाºयांचे दोन दिवसांचे वेतन कापले जाईल, तसेच गट ब (अराजपत्रित), गट क व ड चे कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन सहाय्यता निधीला दिले जाणार आहे. वेतन कपातीस हरकत असल्यास संबंधितांनी विभागप्रमुखास लेखी द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.राजपत्रित गट अ व ब (४३.४८ कोटी), गट ब (अराजत्रित) तसेच क व ड (५२.२१ कोटी), शासकीय अनुदान संस्था (११८.८५ कोटी), सार्वजनिक क्षेत्रातील युनिटे (३३.१७ कोटी) यांचे योगदान राहील, असे भाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस