मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत १९,२१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८,६३,०६२ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. याशिवाय, राज्यात आज ३७८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २५ हजार ९६४ वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ८३,३४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १०९६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या ३९,३६,७४८ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात ६८ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
मुंबईत दिवसभरात १९२९ नवीन रुग्णांची नोंद मुंबईत आज दिवसभरात १९२९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या १,५२,०२४ झाली असून मृतांची एकूण संख्या ७,७९६ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १११० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत १,२१,६७१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या २२,२२० रुग्ण ऍक्टिव्ह असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आणखी बातम्या...
- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक
-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान
- पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल