शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

CoronaVirus News : राज्यात मंगळवारी ४ हजार ९०९ रुग्ण; एकूण मृत्युदर २. ६१ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 1:12 AM

CoronaVirus News: राज्यात सध्या १ लाख १६ हजार ५४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ६ हजार ९७३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई :  राज्यात मंगळवारी ४ हजार ९०९ कोरोना रुग्ण आणि १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ लाख ९२ हजार ६९३ वर पोहोचली असून बळींचा आकडा ४४ हजार २४८ झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४६ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर २.६१ टक्के असल्याची नोंद आहे.राज्यात सध्या १ लाख १६ हजार ५४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ६ हजार ९७३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ९५ हजार ६६६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ११ हजार ९६९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात नोंद झालेल्या १२० बळींमध्ये मुंबई १५, ठाणे ३, नवी मुंबई मनपा ४, कल्याण-डोंबिवली मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भाईंदर मनपा ३, रायगड १, नाशिक ३, नाशिक मनपा १, अहमदनगर २, पुणे १०, पुणे मनपा ७, पिंपरी-चिंचवड मनपा २, सोलापूर ४, सोलापूर मनपा २, सातारा ६, सांगली १२, सिंधुदुर्ग १, जालना ६, हिंगोली २, परभणी मनपा १, लातूर ६, लातूर मनपा ६, उस्मानाबाद ३, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा १, बुलडाणा १, वाशिम १, नागपूर १, नागपूर मनपा ३, वर्धा १, भंडारा ६, गोंदिया १, चंद्रपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.

४६ दिवसांत १ लाख ८२ हजार सक्रिय रुग्णांत घट सप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसली आहे. १७ सप्टेंबर रोजी ही संख्या ३ लाख १ हजार ७५२ होती, ३० सप्टेंबर रोजी ही संख्या २ लाख ५९ हजार ३३ वर येऊन पोहोचली. तर २ ऑक्टोबर रोजी सोमवारी सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ७७ वर येऊन ठेपली आहे. परिणामी, मागील ४६ दिवसांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून हे प्रमाण १ लाख ८२ हजारांनी कमी झाले आहे.

मुंबईत २ लाख ३० हजार रुग्ण कोरोनामुक्त-  राज्यासह मुंबईत ऑक्टोबरच्या पंधरवड्यानंतर कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. मुंबईत सोमवारी १ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ३० हजार ६०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे.-  मुंबईत सध्या १७ हजार ६४५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहर-उपनगरात दिवसभरात सोमवारी ७०६ रुग्ण आणि ३० मृत्यूंची नोंद झाली आहे. n परिणामी, मुंबईत एकूण २ लाख ५९ हजार ११४ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १० हजार ३०५ वर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा काळ १८२ दिवसांवर गेला आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ५७६ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस