मुंबई : राज्यभरात गेल्या २४ तासांत मुंबई पोलीस, रत्नागिरी पोलीस दलातील एकूण दोन अधिकाऱ्यांसह ८ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या आकडा २०२ वर गेला आहे.राज्यभरात १९ हजार ७५६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात २ हजार १४२ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १ हजार ६६२ पोलीस अधिकाºयांसह एकूण १५ हजार ३८० जणांनी कोरोनावर मात केली, तर ३ हजार ७२४ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात गेल्या २४ तासांत ३७१ कोरोनाबाधित पोलिसांची भर पडली असून, ८ पोलिसांना जीव गमवावा लागला. यात मुंबई पोलीस, रत्नागिरी पोलीस दलातील प्रत्येकी एक अधिकारी आणि ठाणे शहर, नाशिक शहर, जळगाव, उस्मानाबाद, नंदुरबार, सांगली येथील सहा पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे.रत्नागिरीतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव ज्योतिबा वसंत पाचेरकर (५४) असे होते. सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ते बिनतारी संदेश विभागात कार्यरत होते.रत्नागिरी पोलीस दलातील कोरोनाने घेतलेला हा पहिलाच बळी आहे. दरम्यान, मागील १५ दिवसांत तब्बल ४६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
CoronaVirus News : राज्यभरात २४ तासांत ८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 5:01 AM