शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

CoronaVirus News: अकोल्यात ८२ वर्षीय आजोबांनी घाबरून न जाता जिद्दीने कोरोनाला केले चितपट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 9:38 AM

जगण्याची तीव्र इच्छा; डॉक्टरांचे परिश्रम, कुटुंबाने दिलेली हिंमत फळाला

- रवी दामोदरअकोला : जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका ८२ वर्षीय आजोबांनी हिंमत, जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनाला चितपट केले. या उतारवयात त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.जगण्याची तीव्र इच्छा, डॉक्टरांचे परिश्रम आणि कुटुंबाने दिलेल्या हिमतीच्या बळावर कोरोनाला मात देणाऱ्या या आजोबांचे नाव आहे लक्ष्मण घायवट. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत गावा-गावात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात या शिबिरांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. असे असतानाही गावातून कोरोना हद्दपार व्हावा, या दृष्टिकोनातून गावात जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन कोरोनाची लक्षणे नसतानाही ८२ वर्षीय लक्ष्मणराव यांनी गावात आयोजित शिबिरात कोरोनाची चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे नातेवाईक घाबरले; मात्र आजोबांनी घाबरून न जाता कोरोनाला चितपट देण्याची खूणगाठ तेथेच बांधली व ही लढाई जिंकलीही. ‘जो डर गया, समझो मर गया!’अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांसह कुटुंबातील सदस्यांच्या मनात भीती दाटली होती; मात्र लक्ष्मणराव यांनीच कुटुंबातील सदस्यांना धीर दिला. कुटुंबातील सदस्य, त्यांचा मुलगा रवी व सून वैशाखी यांनी कोरोना नियमांचे पालन करीत त्यांची योग्य काळजी घेतली. एव्हाने कुटुंबीयांनीही त्यांना सतत हिंमत दिली. कोरोनाला हरवायचे असेल, तर मनातून भीती जाणे गरजेचे आहे, असे लक्ष्मणराव यांनी सांगितले.आरोग्य विभागाचा होता ‘वाॅच’!लक्ष्मणराव यांना सौम्य लक्षणे असल्याने गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरही त्यांच्यावर लक्ष ठेवून  होते. गावातील वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकेमार्फत दररोज आजोबांची ऑक्सिजन लेव्हल, ताप मोजण्यात येत होता. डॉक्टरांच्या परिश्रमाने कोरोनाला हरवणे सोपे गेल्याचे घायवट म्हणाले.