मुंबई : राज्यात शुक्रवारी एका दिवसात २२ हजार ७८ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी परतले. ही आतापर्यंतची दिवसभरात बरे होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून, आज २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान झाले.राज्यभरात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ पोहोचली आहे. सध्या ३ लाख ८८७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ६७ हजार ४९६ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा ३१,७९१ इतका आहे.आज नोंद झालेल्या एकूण मृत्युंपैकी २४४ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १०३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ९३ मृत्युपैकी पुणे मनपा ४०, नागपूर ११, अहमदनगर ९, औरंगाबाद आणि सातारा प्रत्येकी ७, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, तसेच सांगलीत प्रत्येकी ३, तर जळगाव आणि नांदेडमध्ये प्रत्येकी २ मृतांचा समावेश आहे. याशिवाय, बुलडाणा, ठाणे, लातूर, पालघर, सोलापूर आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एका मृताचा समावेश आहे.राज्यात आज कोरोनाच्या ४०५ मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या मृत्युदर २.७२ टक्के एवढा आहे.मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ५६ दिवसांवरमुंबई : मुंबईत शुक्रवारी २,२६७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आणखी कमी होऊन ५६ दिवसांवर आला आहे, तर रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर १.२५ टक्क्यांवर आहे. दिवसभरात ९२५ रुग्ण बरे झाले, तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ८,३७२ झाला आहे. सध्या ३४,१३६ सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत एकूण एक लाख ३७ हजार ६६४ रुग्ण बरे झाले.
CoronaVirus News : दिलासादायक! दिवसभरात २२ हजार रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 2:23 AM