शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

CoronaVirus News : राज्यात केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 4:43 AM

CoronaVirus News : राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र राज्यातील केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.अहवालानुसार, राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी केवळ एक टक्का रुग्ण गंभीर असून पाच टक्के रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संचालनालय विभागाच्या माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या सांख्यिक माहितीचा विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्यात येतो. या अहवालानुसार, राज्यात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण लक्षणविरहित, ११ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. तर ३ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. राज्यात १ लाख ३२ हजार रुग्णसंख्येत ६२ टक्के पुरुष तर ३८ टक्के महिला आहेत. राज्यात कोरोनाचे सहा हजारांहून अधिक बळी गेले आहेत. या मृत्यू झालेल्यांमध्ये ६५ टक्के पुरुष व ३५ टक्के महिला आहेत.4500 बालकांना कोरोनासध्या राज्यात १ लाख ३० हजारांहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी, दहा वर्षांखालील 4525 बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ३.५४ टक्के एवढे आहे. तर११ ते २० वयोगटांतील 8348मुला- मुलींनाही कोरोना झाला आहे. या रुग्णांचे प्रमाण ६.५३% इतके आहे.>प्रयोगशाळांची संख्या १०३राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत.२६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.>राज्यात सर्वाधिक रुग्ण३१ ते ४० वयोगट२५ हजारांहून अधिक२१ ते ३० वयोगट२४ हजार रुग्ण आहेत.४१ ते ५० वयोगट२३ हजार रुग्ण५१ ते ६० वयोगट२२ हजार रुग्ण आहेत.७१ ते ८० वयोगट५ हजार रुग्ण>७८१ रुग्णांची कोरोनावर मातजळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दहा दिवसांत वाढ झाली आहे. दहा दिवसांत ७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़सरासरी ७८ रुग्ण दररोज बरे होऊन घरी जात आहे़ सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असून ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी मानली जात आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस