जालना : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस देशात साधारणपणे १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लसीवर आयसीएमआरचे सरव्यवस्थापक डॉ. बलराम भार्गवा यांच्या नेतृत्वात संशोधन सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले.रविवारी सायंकाळी जालना येथे कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आॅनलाईन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशात आयसीएमआरच्या माध्यमातून १७ वेगवेगळ््या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. १५ आॅगस्टच्या दरम्यान ही लस देशात उपलब्ध हाईल, या दृष्टीने प्रगती सुरू असल्याची माहिती डॉ. भार्गवा यांनी आपल्याला दिली असल्याचे टोपे यांनी सांगितले.
CoronaVirus News : १५ ऑगस्टपर्यंत कोरानावरील लस शक्य; राजेश टोपे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 2:03 AM