मुंबई : राज्यात तब्बल सात महिन्यांनंतर आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी दिवसभरात ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९१.०७ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्युदर २.६३ टक्के आहे. सध्या १ लाख ६ हजार ५१९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यात दिवसभरात काेराेनाच्या ५,२४६ रुग्णांचे निदान झाले असून ११७ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ३ हजार ४४४ झाली असून बळींचा आकडा ४४,८०४ झाला आहे. ज्यात १२ लाख ५२ हजार ७५८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२ हजार ३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
CoronaVirus News : राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 5:29 AM