मुंबई- गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकार कोरोनाच्या मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते आरोप आता खरे ठरताना दिसत आहेत. मुंबईत 862 आणि अन्य जिल्ह्यांतील 466 कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले. असे एकूण 1328 मृत्यू हे अधिकचे कोरोना मृत्यू म्हणून आता नोंदले जातील. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले 3 महिने ही आकडेवारी लपविणार्यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे, असा सवालच देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. ट्विट करत त्यांनी एक प्रसिद्धीपत्रकही शेअर केलं आहे.
तसेच कोविडबाधितांच्या मृत्यूची संख्या, त्याबाबतचे विश्लेषण दैनंदिन आरोग्या वार्तापत्रातून देखली पारदर्शकपणे रोजच प्रसिद्ध करण्यात येत आहे. जन्म व मृत्यू नोंदणी कायदा, १९६९च्या तरतुदीनुसार मृत्यू प्रमाणपत्रामध्ये उचित नोंद घेऊन प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचाही यात उल्लेख आहे. हाच धागा पकडत आता देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा
CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत
India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त
दौलत बेग ओल्डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती
...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट
CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'
आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर
CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली