मुंबई : रोजच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी तब्बल २ हजार ३४७ नवीन रुग्णांची भर पडली. चार दिवसांपासून साधारण पंधराशेच्या आसपास घुटमळणारी संख्या आज थेट दोन हजारांचा टप्पा पार करून पुढे गेली. त्यामुळे येत्या काळातही राज्याच्या महानगरी आणि शहरी भागांतील आकडे वाढतच राहणार का, अशी शंका निर्माण झाली आहे.रविवारी २ हजार ३४७ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. याशिवाय, रविवारी ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७ हजार ६८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर, दिवसभरात ६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात ४४ पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे. आजच्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ७ जण ४० वर्षांखालील आहेत. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता ११९८ झाली आहे. रविवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३ आणि ठाणे जिल्ह्यात १, तर पनवेल शहरात १, लातूरमध्ये १, तसेच अमरावती शहरातील एकाचा समावेश आहे.प्रयोगशाळेत पाठविलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.मार्च महिन्यात प्रयोगशाळेत दररोज साधारण ६७९ नमुने पाठवले जायचे, तर मे महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात हीच संख्या दिवसाला ८ हजार ६२८ इतकी वाढली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे. सध्या देशात दर दहा लाख लोकांमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.सध्या राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १६८८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,९७२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६३.८३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव अशा कोरोना हॉटस्पॉट भागातील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.
7,93,000 रुग्ण आशियातजगातील रुग्णांची संख्या ४७ लाख ५७ हजार झाली असून, त्यापैकी ७ लाख ९३ हजार रुग्ण आशियातील ४८ देशांत आहेत. आशियात सर्वाधिक म्हणजे १ लाख ४८ हजार रुग्ण तुर्कस्थानात असून, त्याखालोखाल इराण (१ लाख २० हजार), भारत (९४,८३५ ) आणि चीन (८२ हजार ) यांचा क्रमांक लागतो. जगात आतापर्यंत ३ लाख १३ हजार ९०० जण मृत्युमुखी पडले आहेत आणि १६ लाख ३१ हजार ७०० जण बरे झाले आहेत.4,987 नवे रुग्ण देशातदेशात गेल्या २४ तासांमध्ये ४,९८७ नवे रूग्ण आढळल्याने एकूण संख्या ९४,८३५ झाली आहे. मात्र २४ तासांत ३,९५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३६ हजार २३६ असून, सध्या ५५ हजार ९४६ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाने आतापर्यंत २९८० बळी गेले आहेत.