मुंबई : देशव्यापी ‘लॉकडाऊन’चा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपल्यानंतर देशाभरातील फक्त कोरोनाबाधित ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये येत्या ३० जूनपर्यंत ‘लॉकडाऊन’ सुरू ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारने शनिवारी जारी केला.
‘कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे दैनंदिन व्यवहार पुन्हा केव्हा व कसे टप्प्याटप्प्याने सुरू करावेत, तसेच ‘लॉकडाऊन’ नसले तरी कोरोना रोखण्यासाठी यापुढे कोणते निर्बंध सुरू राहतील, याची नियमावली केंद्र सरकराने प्रसिद्ध केली आहे. यातच आता अटीशर्थींसह राज्यातील शासकीय कार्यालय टप्प्या टप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी आरोग्य खात्याने नियमावली दिलेली आहे. कार्यालय आणि कर्मचाऱ्यांनी काय खबरदारी घ्यायची याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कार्यालयासाठी सर्वसाधारण नियम...
- कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी-अधिकारी आणि कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक.- हवा खेळती राहण्यासाठी दार-खिडक्या उघडी ठेवावी.- सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी असलेल्या मास्कचा वापर करणे बंधनकारक- तोंडाला आणि नाकाला सतत हात लावणे टाळावे- खोकला-सर्दी झालेली असेल तर टीश्यू पेपर, स्वच्छ धुतलेल्या रूमालाचा वापर करावा- कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर राखणे बंधनकारक- कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागत अर्थात कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक- कार्यालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था- तसेच स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करणे बंधनकारक, स्वच्छतागृहाचा वापर केल्यास हात साबणाने धुणे बंधनकारक- लिफ्ट, बेल, बटन, टेबल-खुर्ची आणि इतर उपकरणे दिवसातून तीन वेळा 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छ पुसून घ्यावीत- कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा अल्कोहल मिश्रीत सॅनिटायझरने पुसून घ्यावे- कार्यालय साबण व पाण्याने धुवून घेणेया सर्व मार्गदर्शक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक.
अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सूचना
- एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करू नये- ई-ऑफिसचा वापर जास्तीत जास्त करावा, ई-मेलवरून फाईल्स शक्यतो पाठवून द्याव्या- कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश द्यावा.- येणाऱ्या प्रत्येकाचे स्क्रीनिंग थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक- मिटींग्ज शक्यतो व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून घ्याव्यात प्रत्यक्ष घेण्याचे टाळावे.- सदर काळामध्ये ऑफिसमध्ये बसून एकत्र डबा खाणे, किंवा एकत्र जमा होणे टाळावे.
कार्यालयात एखाद्यास संसर्ग झाल्यास
- सदर व्यक्तीला 100 पेक्षा जास्त ताप असेल तर त्याला लगेच रूग्णालयात दाखल करावे.- अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबधित कर्मचाऱ्यांना 14 दिवस कार्यालयी प्रवेश देवू नये. त्याबाबत आरोग्य विभागाच्या आदेशाचे पालन करावे.- पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे जे 3 फूटापेक्षा कमी अंतरावरील आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीत असतील तर त्यांचे हाय रिस्क मध्ये वर्गीकरण करावे.- तसेच, तीन फुटाहून जास्त अंतराने संपर्कात आलेल्यांना लो रिस्कमध्ये वर्गीकरण करावे.- हाय रिस्क मध्ये गणना केलेल्या व्यक्तींची संस्थात्मक विलीगीकरणात रवानगी करावी.