मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 47 हजार 288 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 26 हजार 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी थोडीशी कमी असली तरीही राज्याची चिंता अद्याप कायम आहे. काल राज्यात 57 हजार 074 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले होते. (Mahrashtra reports 47,288 new #COVID19 cases, 26,252 discharges and 155 deaths)
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात दिवसभरात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.36 टक्के झाले आहे. तसेच, राज्यात सध्या 24 लाख 16 हजार 981 व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. तर 20 हजार 115 वक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
("25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती )
मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ!मुंबईत आजही कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे मुंबईत 9 हजार 857 रुग्ण आढळले आहे. तर 3 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, दिवसभरात 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 74 हजार 522 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत 29 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत एकूण कोविड वाढीचा दर 1.70 टक्के झाला आहे.