मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो आहे. शनिवारी काेराेनाच्या ४९ हजार ४४७ रुग्ण आणि २७७ मृत्यूंची नाेंद झाली. यापूर्वी, राज्यात शुक्रवारी ४७ हजार रुग्णांची नोंद झाली होती. परिणामी, राज्य शासनासमोर कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली असून मृतांचा आकडा ५५ हजार ६५६ झाला आहे.
सध्या राज्यात ४ लाख १ हजार १७२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्के झाले असून मृत्युदर १.८८ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३ लाख ४३ हजार १२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.५२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ५७ हजार १३५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. शनिवारी नोंद झालेल्या २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ६७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या ६२ हजार १८७ वर पोहोचली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८३ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसांवर पोहोचला आहे. २७ मार्च ते २ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.५४ टक्के असल्याची नोंद आहे. शहर, उपनगरात सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ७० असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६८१ आहे. मागील २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील ३४ हजार २४४ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे.२४ तासांत मुंबईत ९,०९० मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा विळखा वाढतो आहे, त्यामुळे यंत्रणांसमोरचे आव्हान वाढत आहे. शहर, उपनगरात २४ तासांत ९ हजार ९० रुग्ण आणि २७ मृत्यूंची नोंद झाली असून आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार २८२ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ७५१ झाला आहे.
मुंबईत ९ हजार ९० नव्या रुग्णांचे निदानउपचाराधीन रुग्णांची आकडेवारीपुणे ७३,५९९मुंबई ६०,८४६नागपूर ५२,४०८ठाणे ४८,६६०नाशिक ३१,५१२दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चिंताजनक३ एप्रिल ४९,४४७२ एप्रिल ४८,८२७१ एप्रिल ४३,१८३३१ मार्च ३९,५५४३० मार्च २७,९१८