मुंबई : राज्यात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. तसेच, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना व आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ३४७ नवे रुग्ण आढळले असून १८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ३२ हजार ५४४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ४५ हजार १०३ रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८.५२ टक्के इतके झाले आहे. आज दिवसभरात राज्यातील १३ हजार २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.५२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख ७९ हजार १५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ३२ हजार ५४४ (१९.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २४ लाख ३८ हजार २४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार ५४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ४३ हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख ७९ हजार १५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ३२ हजार ५४४ (१९.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या प्रत्यक्षात १ लाख ४३ हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.