मुंबई : चीनमध्ये जन्माला आलेल्या कोरोनाने अवघ्या जगाला कवेत घेतले आहे. भारतातही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आजची धक्कादायक आकडेवारी राज्यासह देशाला चिंतेत टाकणारी आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईने आज कोरोनाच्या 'जन्मदात्या' वुहान शहराला मागे टाकले आहे.
मुंबईमध्ये आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा ५१ हजारावर गेला आहे. तर कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या वुहानमध्ये एकूण 50,340 रुग्ण सापडले होते. या आकडेवारीनुसार चीनच्या वुहानला मुंबईने मागे टाकले असून देशातील असे शहर बनले आहे जिथे सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे आज मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 51000 वर जाऊन पोहोचली आहे.
तर महाराष्ट्रातील दुसरे शहर पुणे सर्वाधिक प्रभावित आहे. पुण्यामध्ये आज कोरोना रुग्णांची संख्या १०००० पार गेली आहे. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाचा मोठा फटका बसला होता. परंतू गेल्या ४८ तासांमध्ये एकही नवीन रुग्ण पोलीस दलामध्ये सापडलेला नाही. राज्याच्या पोलिसांमध्ये २५६२ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये सोमवारी एकाच दिवसात ६४ मृत्यू झाले होते. तर राज्यभरात १०९ रुग्णांनी जीव गमावला होता. मुंबईनंतर देशाची राजधानी दिल्लीचा नंबर लागतो. तिथे 29,943 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. दिल्लीमध्येही ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरात मध्ये ३१, तामिळनाडूमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात ९० हजारांचा टप्पा ओलांडला राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने ९० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात २,२५९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १२० जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या ९० हजार ७८७ झाली असून मृतांचा आकडा ३ हजार २८९ झाला आहे.
35 लाख झाले जगभरात बरेजगभरात आतापर्यंत ३५ लाखांवर लोक बरे झाले आहेत. जगाची एकूण रुग्णसंख्या ७२ लाखांवर गेली आहे, तर जगातील कोरोनामुळे झालेल्या बळींची संख्या ४ लाख १0 हजारांवर गेली. जगात सर्वाधिक बाधित रुग्ण, तसेच सर्वाधिक मृत्यूही अमेरिकेत झाले आहेत. रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिकेनंतर ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन व भारताचा क्रमांक लागतो.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली
धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार
नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन
बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट
ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे
आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग