मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या टप्प्यावर आहे. दिवसागणिक राज्यातील स्थिती गंभीर होत असताना केवळ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे म्हटले जात होते. मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता ९० हजारांहून अधिक तरुण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे केवळ ज्येष्ठांनीच नव्हे तर तरुणांनीही अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.राज्यात सध्या २१ ते ३० वयोगटातील ४२,४५७ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील ४७,८५८५ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.८९ तर ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण २०.१७ आहे.तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनच्या काळाच कामानिमित्त तरुणाईच सर्वाधिक बाहेर पडत आहेत. याच कारणांमुळे ते सर्वात जास्त कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. मेडिकल एज्युकेशन अॅण्ड ड्रग विभाग महाराष्ट्राच्या आकडेवारीनुसार, १४ एप्रिल म्हणजेच लॉकडाऊन १.० पर्यंत राज्यात ९२३ लोक पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर, ३१ मेपर्यंत कोरोनानेग्रस्त झालेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होऊन ती २६,३२५ पर्यंत पोहोचली.याविषयी, संक्रमण रोगाचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोनाच्या विळख्यात तरुणाई अडकण्याची प्रमुख दोन कारणे आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहेत. तर, दुसरे मुख्य कारण म्हणजे अनेक तरुण लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. कुटुंबातील इतर कोणी बाहेर पडू नये म्हणून तरुणच घराबाहेर पडत आहेत, यामुळे तरुणाईला होणाºया संसर्गात वाढ होताना दिसत आहे.निदान उशिरा झाल्याने वाढतो धोका!बºयाचदा ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अतिजोखमीचे आजार उद्भवतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याला अन्य आजारांचा अधिक धोका संभावतो. मात्र आता तरुणाईच्या बाबतीतही हीच स्थिती उद्भवली आहे. तरुण वयात मधुमेह, रक्तदाबाच्या तपासण्या न करणे व या समस्यांकडे दुर्लक्ष करणे तरुणाईसाठी घातक ठरत आहे.याविषयी, डॉ.ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, तरुणाईला जीवनशैलीशी निगडीत आजारांचा विळखा असतो. मात्र बºयाचदा या आजारांचे निदान होत नाही किंवा उशिराने निदान होते तोपर्यंत आरोग्याचा धोका वाढलेला असतो ही बाब लक्षात येत नाही.सध्याच्या काळात तरुणाईसह प्रत्येकाने जीवनशैली, पोषक आहार यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शिवाय, घराबाहेर पडताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही बंधनकारक आहे.
CoronaVirus News : केवळ ज्येष्ठ नव्हे; तरुणाईलाही कोरोना संसर्गाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 7:06 AM