शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

CoronaVirus News: रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यास १५ एप्रिल उजाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:42 AM

CoronaVirus News: अनेक खासगी रुग्णालयांनी गरज नसताना रुग्णांची बिले वाढवण्यासाठी हे इंजेक्शन देणे सुरू केले. त्यामुळे सगळीकडेच रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे

- अतुल कुलकर्णीमुंबई : पहिली लाट ओसरल्यानंतर देशातील सातही कंपन्यांनी डिसेंबर २०२० मध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन थांबवले आणि अचानक मोठ्या प्रमाणात दुसरी लाट आली. त्यातही अनेक खासगी रुग्णालयांनी गरज नसताना रुग्णांची बिले वाढवण्यासाठी हे इंजेक्शन देणे सुरू केले. त्यामुळे सगळीकडेच रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे लोकमतशी बोलताना म्हणाले, ‘‘या कंपन्यांनी डिसेंबर अखेरीस उत्पादन थांबवले होते; पण आता त्यांनी ते पुन्हा सुरू केले आहे. सध्या महाराष्ट्राला दररोज ५० ते ६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली जात आहेत आणि त्यांचा खपदेखील रोज तेवढाच आहे.’’ आता नवीन उत्पादनास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात ते बाजारात जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी १५ ते २० एप्रिल उजाडेल; मात्र खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचा गैरवाजवी वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारी कोविड सेंटर्स किंवा सरकारी रुग्णालयात टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार उपचार केले जात आहे. इंजेक्शन वापरण्याची उपचार पद्धती ठरवून देण्यात आलेली आहे; मात्र खासगी रुग्णालये स्वत:चे बिल वाढवण्यासाठी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. गरज नसतानाही याचा वापर होत आहे, तो थांबवला गेला तर परिस्थिती नियंत्रणात येईल. ही नफेखोरीची वेळ नाही. ज्यादा बिल आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.   - राजेंद्र शिंगणे, मंत्री, अन्न व औषध प्रशासन.सरकारी इस्पितळात तुटवडा नाहीरेमडेसिवीरची मागणी राज्य सरकार करत नाही. सरकारी इस्पितळासाठी त्याचा दर करार करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी इस्पितळात तुटवडा नाही. खासगी रुग्णालय व दुकानदारांना कंपन्यांच्या वतीने पुरवठा होतो. त्याठिकाणी तुटवडा आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले.रेमडेसिवीरचा वापर कोणत्या ठिकाणी किती हाेत आहे...जिल्हा             सरकारी रुग्णालय    खासगी रुग्णालय राज्य              रुग्ण    रेमडेसिवीर    रुग्ण    रेमडेसिवीरनागपूर           १५२६    ४९०    २४३७    २५९८अकोला           २३९    १०७    ३११    २६८यवतमाळ         ३८०    १२३    ३३१    ३५०अमरावती         २३२    ८०    ४९३    ५००सातारा             ४४५    ३५६    २३९    १९२सांगली            २६८    २१४    २८९    २३२सोलापूर          २२८९    १८३१    ३८३५             ३०६८कोल्हापूर          २६१    २०९    ८२५    ६६०नंदूरबार             २७०    २००    ६३०    ७००एकूण             ५९१०    ३६१०            ९३९०    ८५६८गुरुवारची रेमडेसिवीरची रूग्णालयातील स्थितीविभाग    शासकीय     खासगी      एकूणअमरावती    १५,१५२    ३२९५    १८,४४७औरंगाबाद    ३६,३३२    १०,३५५    ४६,६८७नागपूर    ०००    ८४०२    ८४०२पुणे    १०,९०४    १६,४२१    २७,३२५नाशिक    ९७०३    ३००५    १२,७०८मुंबई    १०,५९१    ४८१६    १५,४०७ठाणे    १४,०१२    ३१३०    १७,१४२रेमडेसिवीरसाठी का लागत आहेत रांगा?राज्यातल्या सरकारी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध आहे. तेथे टास्क फोर्सच्या पद्धतीनुसार दिले जात आहे. दुसरी लाट आली आणि रुग्ण वाढू लागल्यामुळे खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्ण स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्याकडे स्वत:चे मेडिकल स्टोअर नाही, त्यामुळे त्यांनी हे इंजेक्शन बाहेरुन आणा, असे सांगितले. ज्या खासगी रुग्णालयात स्वत:चे मेडिकल स्टोअर्स होते त्यांनी मर्यादित स्टॉक आहे, असे सांगत रुग्णांच्या नातेवाइकांनाही बाहेरुन इंजेक्शन घेऊन या, असे सांगणे सुरू केले. ज्यांनी ज्यादा पैसे देण्याची तयारी दर्शवली त्यांना खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन मिळत आहे. परिणामी, राज्यभर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या