मुंबई : राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असून संसर्गाची तीव्रताही अधिक असल्याचे दिसून आले आहे.राज्यात ११ फेब्रुवारी २०२१ रोजी काेराेनाचे ३०,२६५ इतके सक्रिय रुग्ण होते, तर आता ७ एप्रिलच्या नोंदीनुसार या संख्येने पाच लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख १ हजार ७५२, तर ७ एप्रिल रोजी ५ लाख १ हजार ५५९ सक्रिय रुग्णांची नाेंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बुधवारी पहिल्यांदा पॉझिटिव्हीटीचे प्रमाण १५ टक्क्यांवर गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३६ टक्क्यांवर असून मृत्युदर १.७९ टक्के आहे. देशभरात राज्यात सर्वाधिक ५६ टक्के सक्रिय रुग्ण आहेत.सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पहिल्या तीन राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक २.८० टक्के मृत्यूदर असून त्याखालोखाल सिक्कीमध्ये २.१६ टक्के आहे, त्यानंतर राज्यात हे प्रमाण १.७९ टक्क्यावंर आहे.राज्यात १ एप्रिल ते ७ एप्रिल २०२१ या कालावधीत केवळ सात दिवसांत ३ लाख ६० हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे.संसर्गाचा पहिला भर/ पहिली लाट आणि सध्याची परिस्थिती यांची तुलना (रुग्णसंख्या)जिल्हा/ शहर पहिली शिखर पातळी ६ एप्रिल २०२१ची सप्टेंबर २०२० परिस्थितीमुंबई ३४,२५९ ७९,३६८पुणे ८२,१७२ ८४,३०९नाशिक १६,५५४ ३१,६८८औरंगाबाद १०,०५८ १७,८१८नागपूर २१,७४६ ५७,३७२ठाणे ३८,३८८ ६१,१२७
राज्यात ११ फेब्रुवारी २०२१ रोजी ३०,२६५ सक्रिय रुग्ण होते, ७ एप्रिलला सक्रिय रुग्णांनी पाच लाखांचा टप्पा ओलांडला.