जळगाव : पाचोऱ्यातील साईमोक्ष क्वारंटाईन सेंटरमध्ये रात्री उशिरा बांबरुड (राणीचे) येथील एका 33 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा युवक 19 जुलै क्लारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी 20 रोजी घेण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
दरम्यान, घटनास्थळी रात्री 3.30 च्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, डॉ.अमित साळुंखे यांनी भेट देत पाहणी केली. सदर युवकावर शासकीय प्रोटोकाल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. मात्र, या दुर्देवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याशिवाय, या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांचे तपासणी स्वॅब उशिरा येत आहेत. त्यात होळ येथील एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती तीन दिवसांपासून या ठिकाणी क्वारंटाईन असून (त्यांना कोणतेही लक्षणे नसताना ) त्यांचे तपासणी अहवाल अजून आले नाहीत. तसेच, रात्री हा आत्महत्येचा प्रकार त्यांच्या समोर झाल्याने हे कुटुंब भयभीत झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणी अहवाल आज यावेत, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे.
आणखी बातम्या...
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...
CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...