शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

CoronaVirus News: आज कोरोनासारख्या विषाणूंचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 1:04 AM

सूक्ष्म जीवन ना टाळता येत ना पाळता येत असे आपले त्यांच्याशी नाते आहे.

मुंबई : आज आंतरराष्ट्रीय सूक्ष्म जीवसृष्टी दिन आहे. यानिमित्त सृष्टिज्ञान संस्थेतर्फे सूक्ष्म जीवसृष्टी या विषयावर आॅनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. आपल्या सभोवतालच्या सर्वांत मोठ्या जीवसृष्टीची ओळख याद्वारे करून घेता येईल. सूक्ष्मजीव म्हणजे अर्थात जीवाणू, विषाणू आणि बुरशी असे निसर्गातील घटक ज्यांच्या सान्निध्यात आणि सोबतच मानवजात जगात असते. कधी ते आपल्याला उपकारक असतात तर कधी कोरोना सारख्या महामारीचे भयंकर रूप घेऊन आपल्यासमोर येतात. सूक्ष्म जीवन ना टाळता येत ना पाळता येत असे आपले त्यांच्याशी नाते आहे.सूक्ष्म जीवांचे आपल्या जीवनातील स्थान आणि महत्त्व लोकांना लक्षात यावे म्हणून युरोपमधील आयर्लंड देशातील एलिमेंटरी फार्माबायोटिक सेंटर या जीवाणू संशोधन संस्थेने २७ जून हा दरवर्षी जागतिक सूक्ष्म जीवसृष्टी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. युरोपिअन युनियनच्या युरोपिअन फूड इन्फॉर्मशन कौन्सिलने यासाठी पुढाकार घेतला आहे.कोरोना विषाणू संसर्गाने जगाला एका महामारीच्या भयंकर संकटात नेऊन ठेवले आहे. अशा वेळी सूक्ष जीवांबद्दल शास्त्रीय आणि संदर्भीय माहिती सृष्टिज्ञान संस्थेच्या प्रश्नमंजुषेमार्फत मिळू शकेल. आणि सूक्ष्म जीवसृष्टीकडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित व्हायला मदत मिळेल. २७ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच प्रश्नमंजुषेची लिंक फेसबुक व्हॉट्सअप आणि अन्य मार्गाने सृष्टिज्ञान संस्थेच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. या प्रश्नमंजुषेमध्ये मुंबईतील आणि मुंबई बाहेरील शाळा महाविद्यालये भाग घेणार आहेत. सहभागींपैकी ४० टक्के बरोबर उत्तरे देणाऱ्यांना आणि ई-मेल अचूक लिहिणार्यांना प्रमाणपत्र पाठवले जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस