शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
3
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
4
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
5
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
6
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
7
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
8
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
9
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
10
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
11
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
12
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
13
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
14
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
15
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
16
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
17
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
18
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

CoronaVirus News: ...तर आणि तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल; तज्ज्ञांनी दिला लाखमोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 2:54 PM

CoronaVirus Vaccination Maharashtra News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ; प्रशासनाची चिंता वाढली

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या वर्षात कोरोना संकटाची तीव्रता सर्वाधिक असताना जितक्या रुग्णांची संख्या नोंद झाली, त्याहीपेक्षा अधिक रुग्ण आता आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.संपूर्ण देशाचं लसीकरण करण्याची गरज नाही. त्याऐवजी लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा, असा सल्ला साळुंखे यांनी दिला आहे. आपण आजपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण व्हायला हवं. गंभीर आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्यानं लस द्यायला हवी. तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल, असा मोलाचा सल्ला साळुंखे यांनी दिला.अरे व्वा! गरोदर महिला अन् त्याच्या मुलांसाठी इफेक्टीव्ह ठरतेय कोरोनाची लस; संशोधनातून दावादेशाची लोकसंख्या १३५ कोटी, महाराष्ट्राची १२ कोटी, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणाचं आव्हान असं म्हटलं गेलं. पण मुळात इतक्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची गरज नाही. कोरोना स्थिती हाताळण्यात, लसीकरणात महाराष्ट्राला स्वायत्तता द्यायला हवी, अशी गरज साळुंखेंनी व्यक्त केली. पुण्यात दररोज १ लाख लोकांचं लसीकरण व्हायला हवं. खासगी क्षेत्राची मदत घेतल्यास ते शक्य आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात दररोज १ लाख लसीकरण व्हायला हवं, असं ते पुढे म्हणाले.आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस, थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोसगंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची मागणी मी दीड महिन्यांपूर्वीच केली. आपली जीवनशैली पाहता अनेक तरुणांनादेखील गंभीर स्वरुपाचे आजार आहेत. पण त्यांना आपण लस देत नाही. यामागचा तर्क काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा केल्यास इतर राज्यांवर अन्याय होईल, हा युक्तिवाद साळुंखे यांनी खोडून काढला. इतर राज्यांमधील परिस्थिती महाराष्ट्रासारखी नाही. त्यामुळे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातही संपूर्ण महाराष्ट्राऐवजी मुंबई, पुणे आणि रुग्ण संख्या अधिक असलेल्या शहरांना प्राधान्य द्यायला हवं, असं ते म्हणाले.आज कोरोनाची लस घेतली की उद्यापासून आपला कोरोनाचा बचाव होणार असं नाही. शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी वेळ जावा लागतो. या गोष्टीचा विचार लसीकरण करताना करण्यात यावा, असं साळुंखे यांनी सांगितलं. सध्या मुंबई, पुण्यात दररोज कोरोनाच्या ६ हजार केसेस आढळत आहे. पण हे हिमनगाचं टोक आहे. आज आढळून आलेले ६ हजार जण गेल्या काही दिवसांत किमान १० लोकांच्या संपर्कात आले, असा आकडा धरला तरी मग संख्या ६० हजारांच्या घरात जाईल. आताची कोरोना लस जाण्यासाठी एप्रिलचा शेवट उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस