शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

Coronavirus: दिलासादायक! 'या' जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही; अधिकाऱ्यांच्या नियोजनांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 8:43 AM

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे.

कोरोना व्हायरस हे एक जागतिक संकट असून संपूर्ण जग या महामारीचा सामना करत आहे. महाराष्ट्रात तर हे एक युद्ध असल्याचं म्हटलं आहे. या युद्धाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. पंरतु कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढल्याने राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला असून मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने पालिकाप्रशासनचं सर्वस्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करीत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. डॉक्टर हे या लढाईत महत्त्वपूर्ण घटक मानला जात आहे. हे दोघेही जिल्ह्याची प्रमुख पदं सांभाळत असले तरी त्यांचे शिक्षण त्यांना या लढाईत मोलाची साथ देत आहे. कारण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे दोघेही डॉक्टर आहेत. तसेच पोलीस यंत्रणा देखील चोखपणे आपले कर्तव्य बजावत आहे. स्थानिक रहिवाश्यांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना विशेष पास देण्यात आला आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारात किंवा अन्य ठिकाणी गर्दी होत नाही.

चंद्रपूर हा एक औद्योगिक जिल्हा आहे. लगतची तेलंगणा आणि छत्तीसगड (गडचिरोलीला जोडून) ही राज्ये या जिल्ह्याला जोडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र-तेलंगणा आणि गडचिरोलीजवळ छत्तीसगड या तीन राज्यांचं केंद्र असलेल्या चंद्रपूरला कोरोनाचा धोका अधिक असणं स्वाभाविक होतं. मात्र आजपर्यंत या जिल्ह्यात एकही रुग्ण न आढळल्याने गावकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे. सोमवारी एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 352 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे नवे 905 रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 980 जण बरे झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या