शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 5:39 PM

CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपा खासदार नारायण राणेंनी केली होती

मुंबई: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना राजकीय नेते मंडळींच्या राजभवानातील फेऱ्यादेखील वाढू लागल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधी पक्षातील नेतेदेखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीगाठी घेऊ लागल्यानं राजकारण तापल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच काल भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.नारायण राणे अन्याय सहन करत नाहीत. त्यांना तशी सवय नाही. त्यामुळे ते बोलून मोकळे होतात. काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनीदेखील तशीच मागणी केली होती, असं फडणवीस म्हणाले. मात्र आम्हाला राज्यात स्थापन करण्यात सध्या रस नाही. कोरोना विरुद्धच्या लढाईवर आमचं लक्ष आहे. सरकार स्थापन करण्याची आम्हाला घाई नाही. केंद्र आणि राज्यातील भाजपानं कोरोना संकटावर लक्ष केंद्रीत केलं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.राज्यातील कोरोना संकटाची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं ते म्हणाले. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांचे सहकारी सोडून जाऊ लागले आहेत, असं म्हणत फडणवीस यांनी राहुल गांधींच्या विधानाचा संदर्भ दिला. आम्ही महाराष्ट्रात सरकारमध्ये असलो, तरीही तिथे आम्ही डिसिजन मेकर नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. स्वत:वरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र काँग्रेसनं सरकारला बाहेरुन पाठिंबा दिलेला नाही. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले.राज्यातील कोरोनाचं संकट अतिशय गंभीर असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. देशातील ४० टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील परिस्थिती आणखी बिकट आहे. मे महिन्यात मुंबईत झालेल्या कोरोना चाचण्यांचा विचार केल्यास ३० ते ३२ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. देशात हीच सरासरी केवळ ४ ते ५ टक्के इतके आहे. खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दर वाढवले आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाही. रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाहीत, अशी राज्यातील परिस्थिती असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.महाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात!केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे