मुंबई महानगरासह राज्यात कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात ३ हजार ६७० रुग्णांची नोंद झाली. तर ३६ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक १०१६ रुग्ण मुंबई महानगर प्रदेशात नोंदले गेले. अकोला मंडळात ६८३, पुणे ६५७, नागपूर ६३० व नाशिक मंडळात ४०६ रुग्णांची नोंद झाली. वाढत्या संख्येमुळे कोरोना संकंट पुन्हा डोके वर काढत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
एकूण रुग्ण बरे झाले १९,७२,४७५ प्रमाण ९५.९१%
आतापर्यंतचे एकूण बाधित २०,५६,५७५ अॅक्टिव्ह रुग्ण३१,४७४मृत्युदर २.५%