मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचे संक्रमण कमी होते आहे. सलग नवव्या दिवशी राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे सक्रिय रुग्णांच्या संख्येत मात्र काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.राज्यात मागील आठवड्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७१ हजार ९१० होती, यात वाढ होऊन रविवारी ती ७४ हजार १०४ वर पोहोचली आहे. मुंबईतही गुरुवार ९ डिसेंबर रोजी ११ हजार ८८६ सक्रिय रुग्ण होते, यात वाढ होऊन रविवारी ही संख्या १३ हजार ११२ वर पोहोचली. राज्यात मागील काही आठवड्यांपासून पॉझिटिव्हिटी दर हा ६-७ टक्क्यांदरम्यान आहे.ऑक्टोबर महिन्यात पॉझिटिव्हिटी दर हा १७ टक्क्यांच्या जवळपास होता. मात्र आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पॉझिटिव्हिटी दरही कमी होत आहे.राज्यात दिवसभरात काेराेनाचे २,९४९ रुग्णराज्यात सोमवारी काेराेनाच्या २ हजार ९४९ रुग्णांची नोंद झाली, तर ६० मृत्यू झाले. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १८ लाख ८३ हजार ३६५ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा ४८,२६९ झाला आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ६१० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १७ लाख ६१ हजार ६१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के झाले असून, मृत्यूचे प्रमाण २.५६ टक्के आहे. सध्या राज्यात ७२ हजार ३८३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
CoronaVirus News: रुग्ण नवव्या दिवशीही पाच हजारांच्या खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 4:42 AM