मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे.नागपुरात लॉकडाऊन नाही, रात्रीचीच जमावबंदीनागपूर : नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री आठनंतरची जमावबंदी सुरू राहील. मात्र, अन्य कुठलेही स्थानिक निर्बंध यापुढे राहणार नाहीत. बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशांचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री राऊत यांनी यावेळी केली.मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे.मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवरमुंबईत बुधवारी ५ हजार ३९४ रुग्ण आढळले असून, १५ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख १४ हजार ७१४ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६८६ झाला आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २४ ते ३० मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३७ टक्के असल्याचे दिसून आले.
परभणीतील संचारबंदीत पाच दिवसांची वाढपरभणी : विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था आणि व्यापाऱ्यांतून संचारबंदीला होत असलेला विरोध झुगारून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत आणखी पाच दिवसांची वाढ केली असून, आता ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठा बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर १५ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
nमुंबईमृत्युदर - ०.३ टक्केमृत्यू - १५रुग्ण - ५३९४एकूण सक्रिय रुग्ण - ४९९५३nपुणेमृत्युदर - २.०१ टक्केमृत्यू - ३२रुग्ण - ४४५८एकूण सक्रिय रुग्ण - ३३८५८nपिंपरी-चिंचवडमृत्युदर - १.४२ टक्केमृत्यू - १५रुग्ण - २२८८एकूण सक्रिय रुग्ण - ३३२९nऔरंगाबादमृत्युदर - १.१० टक्केमृत्यू - १९रुग्ण - १५४२एकूण सक्रिय रुग्ण - १९४६६nनांदेडमृत्युदर - २.२२ टक्केमृत्यू - २४रुग्ण - १०७९एकूण सक्रिय रुग्ण - १०,१५७nजळगावमृत्युदर - १.८३ टक्केमृत्यू - १४रुग्ण - ११३९एकूण सक्रिय रुग्ण - ११८०३nनाशिकमृत्युदर - १.३३ टक्केमृत्यू - १८रुग्ण - ३३०८एकूण सक्रिय रुग्ण - २९३६६nनागपूरमृत्युदर - २.२५ टक्केमृत्यू - ५८रुग्ण - २,८८५एकूण सक्रिय रुग्ण - ३९,३३१nयवतमाळमृत्युदर - २.२७ टक्केमृत्यू - १०रुग्ण - ४४१एकूण सक्रिय रुग्ण - २४८९nकोल्हापूरमृत्युदर - १.५४ टक्केमृत्यू - ०रुग्ण - १०२एकूण सक्रिय रुग्ण - ७७३