मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार ८२७ रुग्णांची नोंद झाली असून १४२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख २४ हजार ३३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ५ हजार ८९३ झाला आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४९ टक्के झाले असून मृत्यूदर ४.७४ टक्के आहे. सध्या राज्यात ५५ हजार ६५१ सक्रिय रुग्ण आहेत.राज्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. याखेरीज, रुग्णदुपटीचा दर ३३ दिवसांवर गेला आहे. सध्या मुंबईत ६४ हजार १३९ रुग्ण आहेत, तर ३ हजार ४२५ मृत्यू झाले आहेत. तर शहर उपनगरात २८ हजार ४४२ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत शुक्रवारी १ हजार २६९ रुग्णांची नोंद झाली असून ११४ मृत्यू झाले आहेत. या ११४ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू १५ जून पूर्वीचे असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. आतापर्यंत मुंबईत ३२ हजार २६४ जण कोविडमुक्त झाले आहेत.राज्यात शुक्रवारी नोंद झालेल्या १४२ मृत्यूंमध्ये मुंबई ११४, ठाणे २, वसई विरार ५, रायगड ३, नाशिक ३, धुळे ३, जळगाव ३, सोलापूर १ आणि औरंगाबाद ८ या रुग्णांचा समावेश आहे. १४२ मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहे. त्यातील ७४ रुग्णांचे वय ६० हून अधिक आहे. ५७ रुग्णांचे वय ४० ते ५९ आहे. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. सध्या राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर २५ हजार लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १६.९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात प्रयोगशाळा नमुने तपासणीचे प्रमाण प्रति दशलक्ष ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशतापळीवर ४२१० एवढे आहे.
CoronaVirus News: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४९ पोहोचले टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 2:48 AM