शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: "...तर सर्वात आधी पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 4:25 AM

शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे

ठाणे : आशिष शेलार तत्वज्ञानी आणि हुशार आहेत. त्यांनी जी टीका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली, त्यांचा राजीनामा मागितला, तेच गणित भाजपने नरेंद्र मोदींच्या बाबतीत वापरुन त्यांचाही राजीनामा घ्यावा, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते शेलार यांना बुधवारी लगावला.सोमवारी शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र सरकारने काय केले, एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात काय केले, अशी टिका करण्यापूर्वी त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण रेट बघावे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी राज्याला एक दमडी दिली नाही आणि नको तो गवगवा केला जात आहे. परिस्थिती काय आहे, त्यात कशाप्रकारे बोलले पाहिजे, याचेही भान भाजप नेते हरवून बसले आहेत. यात माणसुकीचा धर्म बघायचा की यातही राजकारण करत बसायचे, असा सवाल त्यांनी केला.भाजपला सगळीकडे व्यवहार दिसतात, कारण ते धंदेवाईकच आहेत. म्हणूनच भाजपला शेठजींची पार्टी बोलले जाते. त्यांच्या डोक्यात नेहमीच व्यवहार असतात अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांचे आकडे लपविले जात असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप खोटा आहे. वास्तविक पाहता, पहिल्या दोन महिन्यात लॅब कमी होत्या. त्यामुळे रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला तर तो पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह, हे समजत नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना रुग्णसंख्या परत मोजायला लावली. फडणवीसांचे मंत्रालयात कोण खबरी आहेत, त्यांना कसे कागद पुरविले जातात, याची आम्हाला माहिती असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.चीनच्या हल्यात १९६७ नंतर २0२0 मध्ये जवानांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता देशाने लाल डोळे दाखविण्याची वेळ आली आहे. मोदींनी आक्रमकता दाखवावी. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिल, असे आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.राजकारण करण्याची ही वेळ नाही - एकनाथ शिंदेसध्याच्या परिस्थितीत सर्वानी एकजूट होऊन काम करण्याची आहे. कोणीही राजकारण करु नये, असा टोला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. ठाणे जिल्ह्यात प्रशासनाबरोबर सर्व जण काम करत आहेत. कोणालाही बेडची कमतरता भासणार नाही. जास्तीत जास्त बेडची व्यवस्था तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातJitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे