मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.डिस्चार्ज देण्यात आलेल्या १८ रुग्णांचे नमुने आधी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता १४ दिवसांनंतरचे त्यांचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अजून पुढील १४ दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डिस्चार्ज करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये ५ पुण्याचे, १२ मुंबईचे आणि १ औरंगाबादचा रुग्ण आहे.मृत्यू झालेली महिला पॉझिटिव्हगोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी ६५ वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अशा दोन रुग्णालयांकडून संदर्भित होऊन जनरल हॉस्पिटल, वाशी येथे अत्यंत गंभीर अवस्थेत २४ मार्चला दाखल झाली होती. तिचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. ती कोरोनाबाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरून बुधवारी स्पष्ट झाले.
CoronaVirus Positive News : कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 2:22 AM