ठाणे : कोरोनामुळे स्थगित झालेल्या विवाहांना पुढील महिन्यातही मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाह मुहूर्ताची चिंता करण्याचे काहीही कारण नाही. चातुर्मासातही ते आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली.सध्या संपूर्ण जग कोरोना संकटातून जात आहे. सर्व गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मार्च-एप्रिल महिन्यांत होणारे विवाहही स्थगित केले आहेत. याविषयी सोमण म्हणाले की, पूर्वी पंचांगकर्ते चातुर्मासात म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत पंचांगात विवाह मुहूर्त देत नव्हते. कारण, तशी प्रथा नव्हती. परंतु, या वर्षी पंचांगकर्त्यांनी पंचांगात चातुर्मासात व गुरू-शुक्र अस्त कालातही विवाह मुहूर्त दिले आहेत. पूर्वी पावसाळ्यात शेतीची कामे असायची. तसेच पावसाळ्यात प्रवासाची साधनेही नव्हती. तसेच लोकसंख्याही कमी होती. त्यामुळे चातुर्मासात विवाह मुहूर्त न देण्याची प्रथा पडली असावी, असे ते म्हणाले. आता काळ बदलला आहे. तसेच चातुर्मासात विवाह मुहूर्त देण्यासंबंधी ‘मुहूर्तसिंधू’ वगैरे ग्रंथांत आधारही आहे. म्हणून, पंचांगकर्त्यांनी या वर्षापासून चातुर्मासात विवाह मुहूर्त दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.मुहूर्तांची संख्याएप्रिल- ४, मे-१२, जून-१०, जुलै-१२, आॅगस्ट-१३, आॅक्टोबर-८, नोव्हेंबर-८, डिसेंबर-६
Coronavirus : स्थगित झालेल्या विवाहांना पुढील महिन्यातही मुहूर्त - सोमण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:08 AM