शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

CoronaVirus News: पुण्यातील मंडळांचे ‘आरोग्यपूर्ण’ पाऊल; मंदिरांमध्येच प्रतिष्ठापना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:32 AM

रस्त्यावर ना मंडप, ना देखावा; घरीच मूर्ती बसवून घरीच विसर्जन

पुणे : कोरोनामुळे शहरातील गणेश मंडळांनी ‘आरोग्यदायी’ निर्णय घेतला असून, पन्नास मंडळे रस्त्यावर मंडप उभारणार नाहीत, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना करणार आहेत. महापालिकेनेही घरीच मूर्ती बसवून घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.यंदा बाबू गेनू, हत्ती गणपती, छत्रपती राजाराम मंडळ या प्रमुख मंडळांसह कोथरूड, बिबवेवाडी आदी उपनगरांमधील जवळपास पन्नास गणेश मंडळांनी एकत्र येत मांडव न घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरांमध्येच श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्याचे त्यांनी ठरवले आहे. याआधी प्रशासनाने साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टच्या वतीने शहरातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला.मंदिरामध्ये छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. ‘लाइव्ह दर्शन’ सुुरू करण्याचाही मंडळांचा मानस आहे.असे करा घरच्या घरी विसर्जनगणेशोत्सवात नागरिकांना घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जन करता यावी, यासाठी पुणे महापालिका यंदा तब्बल १५० टन अमोनियम बायकार्बोनेट घेणार आहे.क्षेत्रीय कार्यालय आणि गणेशमूर्ती विक्री केंद्राच्या माध्यमातून ते वितरित केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.कोथरूड, येरवडा, बिबवेवाडीसह काही गणेश मंडळांनी दहा दिवस उत्सव काळातले कार्यक्रम मंडप न करता मंदिरात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांमुळे पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. मंदिरातली विसर्जनाची मूर्ती आम्ही मंदिरातच विसर्जन करणार आहोत. इतर मंडळांनीही याचे अनुकरण करावे.- श्याम मानकर, हत्ती गणपती मंडळयंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव मुख्य मंदिरात होणार आहे. दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, १२७ वर्षांत यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होणार आहे.- अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टलालबागचा राजा, जीएसबी मंडळांचा गणेशोत्सव रद्दमुंबईचा गणेशोत्सव म्हणजे मोठ्या मूर्ती, देखावे, महाआरती, आगमन आणि विसर्जनाच्या थाटातील मिरवणुका, समुद्राशी स्पर्धा करणारी गणेशभक्तांची गर्दी. हे सगळे यावर्षी कोरोनामुळे दिसणार नाही. शहर-उपनगरातील तीन मंडळांनी गणेशोत्सव रद्द करून अन्य उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात लालबागचा राजा, जीएसबी गणेशोत्सव मंडळ (वडाळा) आणि शिवाजी पार्क येथील मंडळाचा समावेश आहे. याशिवाय, अन्य सर्व गणेशोत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार असून उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करतील. त्याचप्रमाणे, या उत्सवादरम्यान सामाजिक भान राखत आरोग्यविषयक उपक्रमही साजरे करण्यात येतील. राज्य शासन-पालिकेने घालून दिलेल्या नियमांचेही पालन करण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली.नाशिकमध्ये ‘व्हीआयपी आरती’ नाहीनाशिक : नाशिक गणेश महामंडळाने शहरात कोणत्याही मंडळाकडून ‘व्हीआयपी आरती’ केली जाणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. त्याऐवजी मंडळाच्या दोन-दोन पदाधिकाऱ्यांना आरतीचा दरदिवशी मान दिला जाणार आहे.सोलापुरात शाडूच्या मूर्तीसोलापूर : शहरातील सर्व मध्यवर्ती मंडळांनी यंदा रस्त्यावरील मंडप तसेच मिरवणूक आदी गोष्टींना पूर्णपणे फाटा दिला आहे. तसेच ‘लोकमत’च्या माध्यमातून ‘घरोघरी शाडूची मूर्ती’ ही चळवळही अनेक गणेशोत्सव मंडळांकडून उत्स्फूर्तपणे राबवली जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यात३00 गावात ‘एक गाव - एक गणपती’ उत्सवकोल्हापूर : जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांनी ‘एक गाव - एक गणपती’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. या उत्सवावर होणारा खर्च सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचे आवाहन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील २०हून अधिक मंडळांची मूर्ती २१ फूट उंच असते; परंतु यंदा फक्त चार फूटच मूर्ती बसवून उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी जाहीर केला आहे.मोठ्या मूर्तीची पूजा; जेथे आहे तेथेच!औरंगाबाद : शहरात ७ गणेश मंडळे दरवर्षी १२ ते १७ फूट उंचीची गणेश मूर्ती बसवतात. काही मंडळे मागील अनेक वर्षांपासून एकच मूर्ती बसवितात. मात्र, यंदा त्या मूर्ती सध्या जेथे ठेवण्यात आल्या आहेत तेथेच त्याची पूजा, आरती करण्यात येईल. मंडपात ४ फुटांपर्यंतची गणेश मूर्ती बसविण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. राजाबाजार येथील देवडीचा राजा गणेश मंडळाची मूर्ती १७ फूट उंचीची आहे. इतर मंडळांत ४ फूट मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा के ली जाईल. काही मंडळांनी यंदा लालबागच्या राजाची ४ फुटांची मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव