नवी दिल्ली : कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीची मुदत १४ एप्रिलला संपत असून, या काळात पूर्णपणे बंद ठेवलेली रेल्वेसेवा १५ एप्रिलपासून सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. ही सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीनेच सज्ज राहा असे रेल्वेच्या १७ विभागांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु रेल्वेने मात्र याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, केंद्रानेहिरवा कंदिल दाखविल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू होईल. त्यासाठी रेल्वेने एक नियोजन आराखडा सर्व विभागांना पाठविला आहे. रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी उपलब्ध गाड्या, रेल्वेचे डबे, गाड्यांच्या फेºया याचे गणित या आराखड्यात मांडले आहे. बंदीच्या कालावधीत रेल्वेची मालवाहतूक सेवा सुरू आहे.
८० टक्केगाड्या धावणार?स्थिती नियंत्रणात असल्यास १५ एप्रिलपासून ८० टक्के रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावू शकतात. त्यात राजधानी, शताब्दी, दुरोंतोसारख्या गाड्या, लोकल गाड्यांही असतील. प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याचाही विचार सुरु आहे.