मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतेय. राज्यात रविवारी १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.२५ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ५५८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ५५८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी १२,२४८ रुग्णांची नोंद तर ३९० मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख १५ हजार ३३२ वर पोहोचली असून मृतांचा आकडा १७,७५७ झाला.राज्यात दिवसभरात नोंद झालेल्या ३९० मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे ७, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ९, कल्याण-डोंबिवली मनपा १३, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा २, मीरा-भार्इंदर मनपा १२, पालघर ५, वसई-विरार मनपा ५, रायगड ५, पनवेल मनपा २, नाशिक ३, नाशिक मनपा ९, मालेगाव मनपा २, अहमदनगर १, अहमदनगर मनपा ३, धुळे मनपा १, जळगाव २४, जळगाव मनपा ४, पुणे १७, पुणे मनपा ५८, पिंपरी-चिंचवड मनपा २०, सोलापूर ७, सोलापूर मनपा ३, सातारा ८, कोल्हापूर ८, कोल्हापूर मनपा ५, सांगली १, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ६, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी २, औरंगाबाद ७, औरंगाबाद मनपा २, जालना १, हिंगोली २, परभणी ४, परभणी मनपा ३, लातूर ३, लातूर मनपा ४, उस्मानाबाद १, बीड १, नांदेड ३, नांदेड मनपा २, यवतमाळ १०, बुलडाणा ३, नागपूर ३, नागपूर मनपा ३७, वर्धा १, गोंदिया १, गडचिरोली १ या रुग्णांचा समावेश आहे.मुंबईत १९,७०० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरूमुंबईत दिवसभरात १ हजार ६ रुग्ण आढळलू असून ४८ मृत्यू झाले आहेत. परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २३ हजार ३८२ झाली असून बळींचा आकडा ६ हजार ७९९ झाला आहे. मुंबईत आता ९६ हजार ५८६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत, तर सध्या १९ हजार ७०० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत २ ते ८ आॅगस्टपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.८१ टक्के आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ७८ टक्के व रुग्ण दुपटीचा दर ८६ दिवस झाला आहे. दिवसभरात १ हजार ७९० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
CoronaVirus News: राज्यभरात आतापर्यंतचे सर्वाधिक १३,३४८ रुग्ण दिवसभरात कोविडमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 2:55 AM