शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

Coronavirus: राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:43 PM

ऊसतोड कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आले होते. अशातच राज्यभरात ऊसतोड कामगार लॉकडाऊन काळात घरापासून दूर अडकले होते. या कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग खुला आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, ऊसतोड कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा असा सल्ला त्यांनी कामगारांना दिला आहे.

राज्यातील साखर हंगाम सुरु झाल्याने जवळपास ३८ साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी कामगार कार्यरत होते. मात्र लॉकडाऊनमुळे या कामगारांसाठी साखर कारखान्याच्या स्तरावर निवारागृह सुरु करण्यात आले. या निवारागृहात कामगारांची संख्या १ लाख ३१ हजार ५०० इतकी आहे. मात्र दिर्घकाळ कामगार आपल्या कुटुंबीयांपासून दूर असल्यामुळे त्यांना स्वगृही परतण्यास विलंब होत आहे. त्यांच्यात असंतोष पसरत असल्याचं महाराष्ट्र राज्य  सहकारी साखर संघाने राज्य सरकारला कळवलं होतं.

यानंतर राज्य सरकारने आदेश काढत या कामगारांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करुन त्यांच्याकडील निवासी पत्त्यासह गावनिहाय, तालुका/जिल्हानिहाय माहिती घेऊन मूळ गावी परत पाठवण्यासाठी Evacuation Plan तयार करावा. या यादीत संबंधित कामगारांच्या गावातील सरपंचाचे नाव, त्यांचा संपर्क क्रमांकही जोडावा. त्यानंतर ही यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवावी असं सांगण्यात आलं आहे.

तसेच सदर कामगारांच्या वाहतुकीबाबत आवश्यक परवाने घेण्याची कार्यवाही साखर कारखान्यांनी करावी. कामगार व त्यांचे कुटुंबीय गावी पोहचल्यानंतर कामगारांचा गावप्रवेश ही सरपंचाची जबाबदारी राहील. मूळ गावी पोहचल्यानंतर साखर कारखान्यांनी सरपंचांकडून ते प्रमाणपत्र घ्यावे आणि ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली यांच्याकडे सादर करावेत असं पत्रकात म्हटलं आहे.

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस